Logo

Chairman's Message

Home /

About Us

/

Chairman's Message

Chairman

Mr. Kantilal Tukaram Gujar

Chairman
चेअरमन यांचे मनोगत

प्रिय सभासद बंधु आणि भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,

बँकेचा २८ वा वार्षिक अहवाल सादर करताना मला विशेष आनंद व समाधान वाटत आहे. सध्याच्या जागतिक घडामोडींचा अर्थकारणावर मोठा प्रभाव पडत असतो. एकच ध्येय, अंतिम विचार - विना सहकार नाही उद्धार ! या तत्वावर विश्वास ठेवून, अर्थव्यवस्थेतील चढ-उतारांचा समतोल राखत, आपल्या सर्वांच्या सहकार्याने व विश्वासाने बँक प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.

ेल्या २८ वर्षांच्या प्रवासात आपल्या बँकेने उल्लेखनीय भरारी घेतली आहे. दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी बँकेच्या ठेवी ₹५५८.८३ कोटी व कर्जे ₹ ३१९.१५ कोटी असून एकूण व्यवसाय र ८७७.९८ कोटी इतका झाला आहे. सन २०२५ - २०२६ या आर्थिक वर्षासाठी ठरविण्यात आलेली ठेवी व कर्जाची उद्दिष्टे शाखांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. यावर्षीही ०% एन.पी.ए.राखण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. सन २०२६ – २०२७ या वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय रु. १०६० कोटींहून अधिक करण्याचे ध्येय आपण समोर ठेवले आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यात 'स्वायत्तता', 'लोकशाही नियंत्रण', 'व्यावसायिकता', 'कडक व स्वतंत्र लेखापरीक्षण' यांसारखे महत्त्वाचे बदल करण्यात आले असून त्यामुळे व्यवस्थापनाची जबाबदारी वाढली आहे. संचालक मंडळ, अधिकारी, सेवकवर्ग, ठेवीदार, कर्जदार, खातेदार व हितचिंतक यांच्या सहकार्याने ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली जात आहे. त्यामुळेच आपली बँक सहकार क्षेत्रातील एक आदर्श व कार्यक्षम संस्था म्हणून ओळख निर्माण करू शकली आहे.

मुक्त अर्थव्यवस्था व स्पर्धात्मक युगात गुणवत्ता टिकवणे ही मोठी जबाबदारी आहे.बँकेने ही जबाबदारी गतवर्षीप्रमाणे यंदाही यशस्वीरीत्या पार पाडली आहे. रिझर्व्ह बँक व सहकार खात्याच्या धोरणांचा, जागतिक घडामोडींचा व स्पर्धात्मक वातावरणाचा विचार करून, ग्राहकांचा विश्वास जपत बँकेची प्रगतीची घोडदौड सुरू आहे.

आधुनिक काळात तंत्रज्ञानाची सांगड घालून बँकेने ग्राहकांसाठी डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. एटीएम, मोबाईल बँकिंग, यूपीआय पेमेंट यांद्वारे पैसे हस्तांतरण, वीज बिल, पाणी बिल, रिचार्ज, विमा हप्ते, कर भरणा इत्यादी व्यवहार सहजपणे करता येतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्कृष्ट सेवा देण्यास बँक कटिबद्ध आहे.

बँकिंग क्षेत्रातील आव्हाने :

नागरी सहकारी बँकांसमोर सायबर सुरक्षा, आयकर भार, तंत्रज्ञान खर्च, स्पर्धा, सायबर गुन्हे, तरलता व्यवस्थापन, नियामक बदल अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या सर्व अडचणींवर मात करून बँक उज्वल भवितव्याकडे वाटचाल करत राहील, असा मला विश्वास आहे.

सामाजिक बांधिलकी :

आपली बँक सामाजिक कार्यातही अग्रस्थानी आहे. सेवक कलागुण सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणा माझी वारी अंतर्गत शबनम बॅग, ज्यूट पाऊच वाटप, स्वच्छता अभियान, ग्राहक व उद्योजक मेळावे, आरोग्य शिबिरे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच ज्येष्ठ सभासदांचा गौरव अशा अनेक उपक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ६१ वर्ष पूर्ण केलेल्या सभासदांचा 'प्रेरणा जीवन गौरव' पुरस्कार व ७४ वर्ष पूर्ण केलेल्या सभासदांचा 'अमृत महोत्सवी मानपत्र' देऊन सन्मान' करण्यात येणार आहे.

ा वर्षी संचालक मंडळाने सभासदांना ११% दराने लाभांश देण्याची शिफारस केली आहे. सभासदांनी त्यास मान्यता द्यावी, ही नम्र विनंती.

बँकेचे संस्थापक-संचालक श्री. तुकारामभाऊ गुजर, सर्व संचालक, अधिकारी, सेवक वर्ग, सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक या सर्वांचा मी ऋणी आहे.

सर्व सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून आर्थिक वर्ष २०२५ - २६ चा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मान्यता द्यावी, ही विनंती.

आपला अमूल्य विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. सामाजिक बांधिलकी, सहकार, प्रगती व भरारी यांचा ध्यास घेऊन आपण सर्वजण एकत्रितपणे उज्वल आर्थिक भविष्य घडवूया.

जगद्‌गुरू तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ !

धन्यवाद !
श्री कांतीलाल तुकारामभाऊ गुजर
चेअरमन, प्रेरणा को - ऑप. बँक लि.